You are currently viewing गणपती आले हो..

गणपती आले हो..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गणपती आले हो…*

 

गणपती आले हो गणपती आले हो

आले हो गजानन

मूषक वाहन सभोवती गण सुपाचे पहा कान..

 

वक्रतुंड नि महाकाय हो रूपात तो गोडवा

असुर माजले सभोवताली तुम्हीच हो सोडवा..

 

वाजवा शंख नि वाजवा डमरू निनादू द्या चाळ हो

खळखळ खळखळ तोडून शृंखला येऊ द्या सुकाळ हो..

 

गळ्यात हार नि शोभती माळा कुंकुम भाळावरी

कटीस मेखला रूणझुण चाळ नि शंखचक्र करी..

 

ठेक्यात पाऊले नाचत गर्जत, मखमली पितांबर

आपण येता भरून जातो आनंद घरभर..

 

पुजा नि आरती गण ही गर्जती उल्हास नगरीत

हासती मुखे पळती दु:खे प्रसाद परातीत ..

 

दहाच दिवस असता राजे वाटती वर्षे दहा

तुमचा उत्सव आमुच्या साठी असते पर्वणी महा..

 

प्रसन्न वदना हे नारायणा सुखाचे हो आगर

ढाळत आसू वाद्ये ही थांबती येताच हो सागर..

 

सागर महान तुमच्यासाठी हो पहुडताच तुम्ही

पाऊले जड घेऊन येतो पेठही पडते सुनी..

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा