You are currently viewing “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना”चे लाभ घेण्याचे आवाहन…

“ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना”चे लाभ घेण्याचे आवाहन…

“ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना”चे लाभ घेण्याचे आवाहन…

सिंधुदुर्गनगरी

शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ करीता इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील, धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी १८ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे, आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेकरिता विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील १२ वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने १ ते १९ सप्टेंबर पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. अर्जाची एक प्रत सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी यांच्याकडे जमा करावयाचे आहे. तरी विद्यार्थ्यांनी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना”चा लाभ घ्यावा, असे सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा