You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प -११३ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प -११३ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।।गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।

__________________________

 

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प -११३ वे ,

अध्याय – १९ वा ,कविता- ५ वी.

___________________________

स्वामींनी बाळास जे सांगितले । ते ज्ञान सर्वांनी पाहिजे जाणले । कळेल मर्म त्यातले । भक्त-जनांना ।। १।।

 

ज्ञानाच्या गावाकडे । जाण्याचे ईश्वराकडे । असे मार्ग कोणते ?हेच कोडे । उलगडून सांगितले स्वामींनी ।।२ ।।

 

सोवळे ओवळे संध्यास्नान । व्रत,उपोषणे, अनुष्ठान ।

असे ज्यात आचरण । स्वरूप हे कर्माचे ।।३ ।।

 

कर्माचे आचरण । नसे सोपे, आहे ते कठीण ।असता यात न्यून । मार्ग कर्माचा ना गवसे ।। ४ ।।

 

मार्ग भक्तीचा । शुद्ध मनाचा ।जो असे मालिन मनाचा ।

त्याच्या हाती काही ना लागे ।। ५ ।।

 

दया,प्रेम,ज्याचे अंतःकरण । करी नित्य हरी-नामस्मरण ।

आस्थेने करितो पूजन श्रवण । भेटेल त्यास श्री हरी ।।६।।

 

एक घ्यावे समजून । भक्ती मार्ग असे कठीण । कर्ममार्गाहून। आहे अवघड आचरण । भक्तिमार्गाचे हो ।।७।।

मार्ग आहे जो तिसरा । मोठा योगमार्गाचा पसारा । समजून घ्यावा सारा । असे जो प्रत्येकांजवळी ।।८ ।।

 

जे आहे ब्रह्मांडात । तेच असे पिंडात । लागते साहित्य जे योगात ।आसने, रेचक, कुंभासाठी ।।९।।

 

कुंडली आणि सुषुम्ना । माहिती असावी साधकांना । करण्या योगासना । तरच जमेल योगसाधना ।। १० ।।

**********

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

__________________________

 

कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे – पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा