You are currently viewing सुगंधी मोगरा

सुगंधी मोगरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सुगंधी मोगरा*

 

आठवणींच्या कुपीत

दरवळतो सुगंधी मोगरा

मनात हसरा

सदोदित….

 

तीक्ष्ण ऊन

भाजून निघे अंग

मोगरा दंग

स्वतः तच

 

शुभ्र कळ्या

घोस मिरविती आपले

पानी लपले

हिरव्यागार…

 

एकेक कळी

अशी बहरून आली

धवल नेसली

वस्रे….

 

सांज झुळूक

मंद गंध पसरवते

मनात जागते

आठवण…

 

गंध माळता

केसात अन् श्वासात

लावण्य भरात

युवतीचे…

 

धवल मोगरा

देव्हाऱ्यात छान खुलतो

विरक्त भासतो

योगी….

 

सुगंधी मोगरा

असाच गंध पेरतो

मनाचा झुरतो

पारवा….!!

 

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा