बोडदेत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
दोडामार्ग l प्रतिनिधी :
बोडदे – गावठणवाडी येथील राज सुनील गवस (वय १९) या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. राज सकाळी खोलीत गेला व त्याने आतून दरवाजा बंद केला. पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने आपले जीवनयात्रा संपविली. दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा केला. घरात गणेश उत्सव सुरू असताना राज याने अचानक आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, बहिण असा परिवार आहे. राज याच्या आत्मघातकी निर्णयामुळे गावात शोककळा पसरली आहे. अधिक तपास दोडामार्ग पोलीस हवालदार वसंत देसाई करीत आहेत.

