*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.सौ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गणपती आरती*
जय देव जय देव जय गजानना
कार्यारंभी तुज करितो प्रार्थना ||धृ||
चौसष्ट कलांचा, तू अधिपती
वरदविनायक, तू गुणपती
गौरीनंदना ,विद्येचा दाता
सुखकर्ता दुःखहर्ता, तू रक्षणकर्ता ||१||
वक्रतुंड तू, गजमुख वरदायक
एकदंत तू ,विघ्नविनाशक
तुज वाणाया, शब्द न पुरती
तिन्ही देव तुज, वंदन करिती ||२||
गौरीतनया ,तू भालचंद्रा
सिंदुर चर्चित, सुहास्य मुद्रा
कृपासिंधु तू ,करूणागारा
साष्टांग नमन, तुजला ईश्वरा ||३||
तुझ्यामुळे आम्हा ,लाभे चैतन्य
न कशाची वाण, नको काही अन्य
ठेव शिरी हात , दे आशिष तुझा
घाल पोटी देवा ,प्रमाद माझा
🌹 *||गणपती बाप्पा मोरया||* 🌹
**************************
©️®️ डॉ .सौ.मानसी पाटील

