You are currently viewing पुण्याचे अपर पोलीस आयुक्त माननीय श्री संजय पाटील

पुण्याचे अपर पोलीस आयुक्त माननीय श्री संजय पाटील

महसूल मासानिमित्त प्रशासनातील दीपस्तंभ

 

पुण्याचे अपर पोलीस आयुक्त माननीय श्री संजय पाटील

 

 

 

पुण्याचे सध्याचे अपर पोलीस आयुक्त श्री संजय पाटील यांचा माझा पहिला परिचय ते अमरावतीला असताना झाला. साहेब तेव्हा अमरावतीला अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते .आमची डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ही मुलांना फक्त एक रुपयांमध्ये आयएएस तसेच तस्सम परीक्षेचे प्रशिक्षण देते. त्यामुळे सनदी अधिकाऱ्यांचा आमचा वारंवार संपर्क येतो .अशाच संपर्कामध्ये श्री संजय पाटील साहेबांचा व माझा परिचय झाला व तो पुढे वाढतच गेला.

 

साहेबांची बदली पुढे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झाली .मालेगावला असताना देखील साहेबांनी माझा मी आय ए एस अधिकारी होणारच हा कार्यक्रम पोलीस विभागातर्फे इथल्या नागरिकांसाठी इथला पत्रकारांसाठी व विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता.

 

परवापर्यंत साहेब नागपूरला अपर पोलीस आयुक्त होते. तेव्हा देखील मी आठवणीने त्यांच्या भेटीला जात असे. नागपूर ते अमरावती हे अंतर फारसे नाही. पाटील साहेबांना आमच्या दुसऱ्या वर्गापासून आयएएसचे प्रशिक्षण हा उपक्रम खूपच आवडत होता. माझी नागपूरला त्यांची भेट झाली तेव्हा नागपूरला राष्ट्रीय स्तरावरील पोलिसांच्या स्पर्धा होत्या .खरं म्हणजे तेव्हा ते खूपच व्यस्त होते .पण त्याही व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी वेळ काढला व आमचे आदरतिथ्य येथे केले.

 

नागपूरनंतर साहेबांची पुणे पोलीस आयुक्तालयात अपर पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक झाली. मला ते माहित झाले आणि म्हणून परवा पुण्याला आल्याबरोबर मी व माझे दुसरे सहकारी प्राध्यापक राजेश चव्हाण साहेबांना भेटायला पुणे पोलीस आयुक्तालयात गेलो .आम्ही विजिटिंग कार्ड आत मध्ये पाठवताच साहेबांनी एका मिनिटात आम्हाला बोलावले. चहापान झाल्यानंतर मी साहेबांचा व प्राध्यापक राजेश चव्हाण यांचा परिचय करून दिला. माझा जसा दुसऱ्या वर्गापासून आय ज एस चे प्रशिक्षण हा उपक्रम साहेबांना आवडला तसाच राजेश चव्हाण यांचा पालक संजीवनी हा कार्यक्रम श्री संजय पाटील यांना खूपच भावला .ते म्हणाले आपण उद्याला या पालक संजीवनी कार्यक्रमाचा कार्यक्रम आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ठेवू या .

एवढे म्हणून ते थांबले नाहीत तर त्यांनी लगेच त्यांच्या पीएला बोलावले आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पोलीस आयुक्तांचे आयुक्तालयातील सभागृहामध्ये प्राध्यापक राजेश चव्हाण यांचा जीवन संजीवनी पालक संजीवनी हा कार्यक्रम आयोजित केला .

 

खरं म्हणजे गणपतीचे दिवस आणि पुण्याचे गणपतीच तर पूर्ण जगात प्रसिद्ध आहेत.पण म्हणतात ना जीतनेवाले कोई अलग काम नही करते व हर काम अलग ढंग से करते है या नात्याने माझ्या पोलीस बांधवांना खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ प्राप्त व्हावा व त्याचे जीवन सुखकर व्हावे यासाठी त्यांनी पोलीस बंदोबस्ताचे गणपतीचे दिवस असतानाही आमच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

 

दुसऱ्या दिवशी आम्ही पोलिस आयुक्तालयात पोहोचलो. मी माझ्या काही पुण्याच्या मित्रांनाही या कार्यक्रमाला निमंत्रित केले होते. त्यामध्ये श्री सुभाष चराटे व श्री विनोद जोशी यांचाही समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहेबांनी आमचा परिचय करून दिला आणि मला मी आयएस अधिकारी होणार हा कार्यक्रम थोडक्यात प्रस्तुत करायला सांगितला .तसेच प्राध्यापक राजेश चव्हाण यांची तोंड ओळख करून देण्याची जबाबदारीही माझ्यावर सोपवली .

 

प्राध्यापक राजेश चव्हाण आणि मी दोघेही पट्टीचे वक्ते आहोत .आमच्या दोघांचेही संपूर्ण भारतात 15000 च्या वर कार्यक्रम संपन्न झाले आहेत.त्यामुळे आम्हाला कुठेही केव्हाही कधीही उभे केले तरी आम्ही समोरचा रसिक जिंकून घेतो. पाचचा कार्यक्रम सहा वाजले साडेसहा वाजले पावणे सात वाजले तरी पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी उठायला तयार नव्हते .इतके ते पालक संजीवनी या कार्यक्रमात रमले. त्याला कारणही तसेच आहे. प्राध्यापक चव्हाण हे तन मन धनाने हा कार्यक्रम सादर करतात .कर्मचाऱ्यांनी पालक संजीवनीचा एक पूर्ण दिवसाचा कार्यक्रम पोलीस आयुक्तालयात आयोजित करावा अशी सूचना माननीय अपर पोलीस आयुक्त श्री संजय पाटील साहेब यांना केली. कारण बऱ्याचशा कर्मचाऱ्यांचे मते पडले की गणपती मुळे बरेचसे कर्मचारी कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. एक दिवसाची पूर्ण कार्यशाळा आयोजित करावी ही सूचना कर्मचाऱ्यांकडून आली. साहेबांनी त्याला अनुमोदन दिले आणि माझे आणि राजेश चव्हाण यांचे आभारही मानले .ते म्हणाले बघा मी पटकन निर्णय घेतला. तो कामात आला ना .नाहीतर आपण गणपती संपेपर्यंत थांबलो असतो तर या कर्मचाऱ्यांमध्ये जे बदल आज झाले त्या बदलाला दहा दिवस अजून लागले असते. म्हणून मी पटकन निर्णय घेतो आणि तो अमलात आणतो.

 

 

साहेबांची आमची भेट घ होते काय ? साहेब कार्यक्रम ठेवतात काय आणि कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळतो हे सर्वच अगदी अघटीत असेच झाले. गणपतीमध्ये पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस विभाग सगळ्यात जास्त सतर्क असतो. पण अशा गणपतीच्या काळातही माननीय श्री संजय पाटील साहेब अपर आयुक्त पोलीस आयुक्तालय पुणे यांनी आमच्या कार्यक्रमाचे आयोजन करू स्वतःमधील ली तात्परता तेजस्विता व तपस्विता या निमित्ताने प्रगट करून दिली. अशा या कर्तव्यदक्ष अपर पोलीस आयुक्तांना महसूल मासानिमित्त हार्दिक शुभेच्छा

 

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा