You are currently viewing सावंतवाडी संस्थानकडून गणरायाची प्राणप्रतिष्ठापना भक्तिभावात

सावंतवाडी संस्थानकडून गणरायाची प्राणप्रतिष्ठापना भक्तिभावात

सावंतवाडी :

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी संस्थानच्यावतीने दीड दिवसांच्या मंगलमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना देवघरात करण्यात आली. राजघराणे सावंत-भोसलें कुंटुंबीयांकडून गणरायाची आराधना करत जनतेला सुखी, समाधानी, आनंदी ठेव असे साकडे घालण्यात आले.

पुरोहित शरद सोमण यांच्या मंत्रोच्चारात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर पूजन, आरती, भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी राजघराण्याकडून गणरायामध्ये मोदकांसह नैवेद्य अर्पण करण्यात आला.

युवराज लखमराजे भोसले यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत गणरायाच्या व श्री देव पाटेकराच्या कृपाशिर्वादाने हा उत्सव काळ निर्विघ्नपणे पार पडावा, जनतेच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे मागणे केले. तसेच युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनीही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, राजकन्या उर्वशीराजे भोसले, राजघराण्याचे जावई संदीप बोथी रेड्डी आदींसह गणेशभक्त उपस्थित होते.

संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. राजघराण्याकडून वर्षानुवर्षांची परंपरा पुढे नेत श्रद्धा व भक्तिभावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून उत्सव साजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा