You are currently viewing फोंडाघाटमध्ये रात्रभर वीज गायब;

फोंडाघाटमध्ये रात्रभर वीज गायब;

फोंडाघाटमध्ये रात्रभर वीज गायब; गणेशोत्सवाच्या तयारीवर पाणी, एमएसईबीवर नागरिक संतप्त

फोंडाघाट

फोंडाघाट परिसरात मंगळवार रात्री ११ वाजल्यापासून सलग ९ तास वीजपुरवठा बंद आहे. श्री गणेशाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी घराघरात सजावट आणि तयारी सुरू असताना अचानक वीज गेल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. विजेशी संबंधित एमएसईबीच्या स्थानिक कार्यालयाचे फोनही बंद असून संपर्क न होऊ शकल्याने संताप आणखी वाढला आहे. अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे बिघडल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. या संदर्भात मंत्री नितेश राणे यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा