You are currently viewing गणपतीबाप्पा

गणपतीबाप्पा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम भक्तीगीत*

 

*गणपतीबाप्पा*

 

वाजतगाजत आली गणेशाची स्वारी

गणपती बाप्पा आले आमच्या घरी !!धृ!!

 

रांगोळी तोरण मांडला चौरंग

भक्तीच्या रंगात सानथोर दंग

उत्सव साजरा बाप्पांचा भारी!!१

 

चौसष्ट कला विद्येची देवता

सौम्य शांत रूप तेजस्वी खुलता

दुर्वांची जुडी वाहते शिरी!!२

 

जास्वंदमाला, आरास सुबक

आरती प्रसाद एकवीस मोदक

श्रध्देने भजता दु:ख जाई दूरी!!३

 

शरण तुला भक्त, संकट तारतो

दैन्य दु:ख पीडा नित्य दूर करतो

नाम तुझे मुखात आशिष दे शिरी!!४

 

००००००००००००००००००००

 

अरुणा दुद्दलवार✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा