शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशाची संधी
सिंधुदुर्गनगरी
समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला- मुलींच्या शासकीय वसतिगृहाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ला अशा 3 ठिकाणी तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड असे 5 ठिकाणी आहेत. या 8 शासकीय वसतिगृहामध्ये विदयार्थी, विद्यार्थीनीना शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली, असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले दिली आहे.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर शासकीय वसतिगृह प्रवेश योजनेचे लाभ ऑनलाईन पध्दतीने https://hmas.mahait.org या पोर्टलवर अर्ज भरण्यात यावे. तरी गरजू विद्यर्थ्यांनी प्रवेशाबाबत संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने भरलेला अर्जाची प्रत दि. 15 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
शासकीय वतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय – वाफ आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावरील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचा 02362 228882 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

