You are currently viewing कामगार नेते र.ग.कर्णिक यांचे ९३व्या वर्षी निधन

कामगार नेते र.ग.कर्णिक यांचे ९३व्या वर्षी निधन

शिक्षक भारतीच्यावतीने कामगार नेते र.ग.कर्णिक यांना श्रद्धांजली

तळेरे

महाराष्ट्रातील 19 लाख शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सर्वज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांचं आज वृद्धापकाळाने वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी कर्मचाऱ्यांची अत्यंत संघटीत अशी चळवळ उभी केली. केवळ सरकारी कर्मचारीच नव्हे तर असंघटीत कर्मचारी यांच्या बाजूनेही ते सतत उभे राहिले. सामाजिक न्यायाच्या चळवळींबद्दलही त्यांनी आपली बांधिलकी कायम ठेवली होती. लाल निशाण चळवळीतून ते पुढे आले. मार्क्सवादी, समाजवादी चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर होता. आणि तो विचार त्यांनी अखेर पर्यंत जपला. त्यांच्या जाण्याने चळवळीचं प्रचंड नुकसान झालेले आहे अशा शब्दांत लोक भारती व शिक्षक भारतीचेे संस्थापक अध्यक्ष आम.कपील पाटील यांनी भावना व्यक्त करीत कामगार नेते र.ग.कर्णिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.तसेच शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनीही एका अभ्यासू नेत्याला राज्यातील कर्मचारी मुकले अशा शब्दांत शोक व्यक्त केला आहे.

र. ग. कर्णिक

प्रतिक्रिया व्यक्त करा