You are currently viewing पाऊस

पाऊस

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पाऊस*

🌦️🌧️⛈️🌨️🌧️🌧️🌧️

माणसा माणसा तू असा कां वागतोस?

उंच उंच इमारती बांधून, आकाशाला भिडतोस,

मी पडलो नाही तरी रडतोस,

जोरात पडलो तरी घाबरतोस.

 

माणसा माणसा तू असा कां रे

वागतोस?

तंत्रज्ञानाच्या जोरावर निसर्गावर

मात करतोस,

झाडे भुईसपाट करुन, टोलेजंग

इमारती बांधतोस,

सृष्टीचे नियम तोडून, स्वतः ची

मनमानी करतोस.

 

मग मीही ठरवले, आपण सुद्धा

बघावे, माणसासारखे वागून

देवाने बुद्धी दिली म्हणून, तू

गेलास शेफारुन,

आजपर्यंत किती दिले तुला, सढळ हाताने विनामूल्य,

ठेवली कां किंमत माझी, आता कळले ना मी कितीअमूल्य.

 

जेंव्हा मी पडत नसतो, तेव्हा तू रडत बसतो,

आनंदाने रिमझिमतो तेंव्हा तुला आनंद होतो,

कधीकधी मलाही राग येतो बरं कां, तुझ्या स्वार्थी वागण्याचा

आणि मग बेभान होऊन मी

वेड्यासारखा धो धो कोसळतो.

 

जेव्हा तू ही थोडेफार निसर्गाचे

नियम पाळशील.

मग मी हीविचारकरेन,सुधारतेय

सावरतेय मानवजात,

तुझ्या सोयीनुसार पडून, शेत बागायत फुलवेन.

आनंदाने वर्षाव करुन, करेन

सृष्टीवर सुखाची बरसात.

 

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

प्रतिक्रिया व्यक्त करा