You are currently viewing यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सभासदांचे वाढदिवस आणि विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सभासदांचे वाढदिवस आणि विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सभासदांचे वाढदिवस आणि विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

यमुनानगर, निगडी-

दिनांक २४ ऑगस्ट रोजीनाना नानी उद्यानातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत संघाच्या उपाध्यक्ष श्रीमती मंगला पाटसकर यांना नवयुग साहित्य शैक्षणिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या श्रावणी काव्य स्पर्धेत विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल , तसेच , सौ.माधुरी डिसोजा यांनीदेखील या काव्य स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल सन्मानपत्र मिळवले याबद्दल संघातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
मासिक सभेत वाढदिवसानिमित्त श्री प्रमोद देवकर, सौ. माधुरी डिसोजा,सौ प्रतिभा निफाडकर,श्रीमती कुमुदिनी देशपांडे व सौ अनुरापा अढी यांचा भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष श्री गजानन ढमाले यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सदस्यातून लकी ड्रॉ पद्धतीने श्री.तुळशीराम ढवळे यांना भेटवस्तू देण्यात आली. भेटवस्तूचे प्रायोजक होते श्री अशोक नहार .
या कार्यक्रमास बहुसंख्येने सभासद उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात श्री. चंद्रकांत सुर्वे.,
श्री..प्रदीप मुजुमदार,श्री दत्तात्रय गुंजाळ,श्री बाळासाहेब चव्हाण, श्री गोविंद खवासखान यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संघाची प्रार्थना व पसायदान होऊन कार्यक्रम संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा