You are currently viewing “ग्राहक संरक्षण परिषद,सिंधुदुर्गच्या वतीने मा.जिल्ह्याधिकारी यानां निरोप”

“ग्राहक संरक्षण परिषद,सिंधुदुर्गच्या वतीने मा.जिल्ह्याधिकारी यानां निरोप”

“ग्राहक संरक्षण परिषद,सिंधुदुर्गच्या वतीने मा.जिल्ह्याधिकारी यानां निरोप”
…अँड.नकुल पार्सॅकर…

सुमारे गेल्या दहा वर्षांपासून मला सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.मा.ई रवींद्रन,दिलीप पांढरपट्टे साहेब,सौ.मंजूलक्ष्मी मॅडम अशा काही जिल्ह्याधिकारी या ग्राहक संरक्षण परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष लाभले.वेळोवेळी अशासकीय सदस्य म्हणून काम करताना या सर्वाचेच बहुमोल मार्गदर्शन मिळाले.अनेकदा जिल्ह्याधिकारी काही कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत त्यावेळी विद्यमान निवासी जिल्ह्याधिकारी मा.सुकाटे साहेब, तत्कालीन अतिरिक्त जिल्ह्याधिकारी मा.मंगेश जोशी सर परिषदेत येणारे विषय हाताळत असतं.
मी अणि माझे इतर अभ्यासू व अनुभवी सहकारी ग्राहकांच्या अनेक दैनंदिन समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. महाराष्ट्र वीज वितरण कंपनी,भारत संचार निगम ,राज्य परिवहन महामंडळ,पोलीस खाते,कृषी विभाग, औषध प्रशासन, आरटीओ,वजन मापे,आरोग्य अशा विविध खात्याचे अधिकारी या ग्राहक संरक्षण परिषदेत उपस्थित राहून सदस्यांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतात.
गेले वर्षभर विद्यमान जिल्ह्याधिकारी मा.अनिल पाटील साहेब अनेकदा या बैठकीला उपस्थित राहून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सहकार्य केले.पाटील साहेब नियत वयोमानानुसार येत्या ३१ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत असल्याने आज त्यांची शेवटची मिटिंग होती.आज ग्राहक संरक्षण परिषदेच्या मिटिंगमध्ये परिषदेचे मा.सचिव तथा जिल्ह्या पुरवठा अधिकारी यांच्या परवानगीने मा.अनिल पाटील साहेबांचा अभिनंदनाचा व निवृत्तीपर शुभेच्छाचा ठराव सर्व अशासकीय सदस्यांच्या वतीने मी मांडला त्याला सर्वाने एकमुखाने पाठिंबा देऊन साहेबांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा