गणेशोत्सवानिमित्त समीर नलावडे यांच्या पुढाकाराने कणकवलीत १० हजार मोफत कमळांचे वाटप
कणकवली
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पटवर्धन चौक येथे १० हजार मोफत कमळांचे वाटप करण्यात येणार आहे.
भाजप पक्षाच्या प्रतिकात्मक निशाणीचे घराघरांत वितरण होण्याच्या संकल्पनेसह, गणेशोत्सव काळात भक्तीभावात राष्ट्रभक्तीचा ही समावेश करण्याचा हा उपक्रम आहे. याआधीही दोन वर्षांपूर्वी असा उपक्रम राबवण्यात आला होता, ज्याला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
यंदाही प्रत्येक नागरिकास प्रत्येकी दोन कमळ देण्यात येणार असून, या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. समीर नलावडे यांनी कणकवलीकरांना केले आहे.
शुभारंभ: २६ ऑगस्ट, सकाळी १० वाजता, पटवर्धन चौक, कणकवली
