जळगाव (बबनराव वि.आराख) :
उज्जेनकर फाउंडेशन तर्फे शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलनाचा दुसरा भाग छत्रपती संभाजी नगरच्या उपजिल्हाधिकारी सौ.अंजली धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यात शिव श्रावणधारा राज्यस्तरीय कवी संमेलनाचे दिनांक १६ ऑगस्ट व दिनांक २३ ऑगस्ट या दोन शनिवारला उत्साहात आयोजन करण्यात आले. २३ ऑगस्ट रोजी आयोजित ऑनलाइन कवी संमेलनाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या डेप्युटी कलेक्टर तथा सुप्रसिद्ध साहित्यिक सौ. अंजलीताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ४१ कवींनी सहभाग घेऊन उत्साहात आयोजन करण्यात आले. तर पहिल्या भागामध्ये ३१ कवींनी, कवयित्रींनी आपल्या कविता सादर करून दाद मिळवली. याप्रसंगी उपस्थित कवी, कवयित्रींनी श्रावण, पर्यावरण, निसर्ग यावर उत्कृष्ट कविता गाऊन उपस्थितांची टाळ्या वाजवून दाद मिळवली. या ऑनलाईन कवी संमेलनाच्या सूत्रसंचालक उज्जैनकर फाउंडेशनच्या राज्य संपर्कप्रमुख तथा मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, अमरावतीच्या मराठी विभाग प्रमुख त्यांनी सुरेल सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी पहिला भागाच्या ऑनलाईन कवी संमेलनाच्या अध्यक्षा तथा फाउंडेशनच्या पुणे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्षा कवयित्री सौ. रूपालीताई चिंचोलीकर फाउंडेशनचे संस्थापक डॉ.अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या कार्यकारिणी खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय तथा राज्य सल्लागार निवृत्त डीवायएसपी सटाणा येथील श्री चिंतामण शिरोळे साहेब फाउंडेशनच्या आजीव सभासद तथा जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य महाविद्यालय यावलच्या प्राचार्या डॉ. संध्याताई सोनवणे फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. सुभाष बागल राज्य सचिव छत्रपती संभाजीनगर येथील एडवोकेट सर्जेराव साळवे राज्य संपर्कप्रमुख तथा राज्य नियोजन समितीचे अध्यक्ष अकोला येथील कवी डॉ. अशोक शिरसाठ राज्य सल्लागार अकोला येथील श्री तुळशीराम बोबडे राज्य संघटक पुणे येथील डॉ. श्रीकांत धुमाळ राज्य सल्लागार पुणे येथील श्री बाळकृष्ण अमृतकर सर भुसावळ येथील आजीव सभासद भुसावळ येथील प्रा. राजश्री देशमुख फाउंडेशनचे कार्यकारणी सदस्य श्री संतोष ठाकूर सर नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रा. प्रशांत रणसूरे नाशिक जिल्हा सचिव श्री ईश्वर मगर धुळे जिल्हा अध्यक्ष शिरपूर येथील प्रा. अश्विन अमृतकर पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री जगन्नाथ बुडूखले गुरुजी जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री किशोर पाटील सर जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री मधुकर पोतदार साहेब जळगाव जिल्हा संघटक श्री विनायक वाघ जळगाव जिल्हा संघटक भुसावळ येथील श्री ज्ञानदेव इंगळे बुलढाणा जिल्हा समन्वयक खामगाव येथील श्री बाळूभाऊ ईटणारे बुलढाणा जिल्हाध्यक्ष शाहीर मनोहरराव पवार बुलढाणा जिल्हा अध्यक्ष खामगाव येथील श्री शंकरराव अनासुने सर ठाणे जिल्हा समन्वयक श्री रमेशभाऊ उज्जैनकर श्री गणेश कोळी सर यांच्या मातोश्री सौ. विमलबाई कोळी पुणे येथील श्री रामचंद्र गुरव आदी पदाधिकारी कवी कवयित्री या ऑनलाइन कवी संमेलनामध्ये सहभागी होते.
याप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले. याप्रसंगी या ई कवी संमेलनाच्या अध्यक्ष छत्रपती संभाजी नगर उपजिल्हाधिकारी तथा साहित्यिक सौ.अंजलीताई धानोरकर यांनी आपल्या मनोगता मध्ये उज्जैनकर फाउंडेशनचे व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांच्या कार्याचे अभिनंदन केले. या ई कवी संमेलनाच्या सुरेल सूत्रसंचालन उज्जैनकर फाउंडेशनच्या राज्य संपर्कप्रमुख अमरावती येथील डॉ. मंदाताई नांदुरकर यांनी केले. या ऑनलाईन कवी संमेलनाचे नियंत्रक उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव श्री गणेश कोळी सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन फाउंडेशनचे राज्य सचिव छत्रपती संभाजी नगर येथील ॲड सर्जेराव साळवे यांनी केले. ऑनलाइन कवी संमेलनाचा हा दुसरा भाग जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
