मालवण :
शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित राज्यस्तरीय नारळ लढविणे २०२५ रील्स स्पर्धेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी उद्या सायंकाळी ५ वाजता रॉक गार्डनजवळील आसरे महाल येथे उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
तसेच अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी ९४२२५४६४६१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.
