गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक नियोजनाची अंमलबजावणी करा
सिंधुदुर्गनगरी
गणेशोत्सव शांततेत, सुरळीत व भक्तीमय वातावरणात पार पाडण्यासाठी वाहतूक नियोजनाबाबत निर्गमित केलेल्या आदेशाचे अंमलबजावणी करावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक नियोमी साटम यांनी केले आहे.
गणेशोत्सवाकरीता मुंबई, पुणे तसेच इतर जिल्हे व राज्यातुन कोकणचे चाकरमनी आपल्या कुंटुंबासह मूळ गावी सिंधुदुर्गात रेल्वे, बसेस व खाजगी वाहनाने मोठ्या संख्येने येतात, त्यावेळी पे-जा करणाऱ्या चाकरमनी, प्रवाशाना प्रवासात कोठे ही गैरसोय होऊ नये, वाहतुक कोंडी होऊ नये, प्रवास सुरळीत व सुरक्षित व्हावा यासाठी दरवर्षी शासन व जिल्हा पोलीस दलाच्यावतीने जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावर आवश्यकतेनुसार फिक्स पॉइंट, पेट्रोलींग नेमुन वाहतुकीचे नियोजन करण्यात येते.
सन 2025 चा गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पडावा, प्रवाशाना/चाकरमान्याना वाहतुकीचा कोणताही त्रास होऊ नये, प्रवास वेळेत व सुरक्षित व्हावा, याकरीता शासनाकडून कोकणवासीयांच्या सोयीसाठी पनवेल ते इन्सुली (सिंधुदुर्ग) या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 (रा.म.क्र जुना क्र. 17) वरून होणऱ्या अवजड वाहतुकीच्या निबंधाबाबत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास, मुर्तीचे आगमन दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी 1 वाजेपासून ते दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी 23 वाजेपर्यतच्या कालावधीत मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहील.
05 व 07 दिवसाचे गणपती विसर्जन गैरी गणपती विसर्जन, काही अंशी परतीचा प्रवास दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजेपासुन रात्री 23 वाजेपर्यंत आणि दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजेपासून रात्री 23 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड, अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल ट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहील.
अनंत चतुर्दशी 11 दिवसाचे गणपती विसर्जन परतीचा प्रवास दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी 8 वाजेपासून ते दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी 20 वाजेच्या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे, (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहील.
राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर संपुर्ण बंदी प्रवास असलेल्या कालावधी व्यतिरीक्त उर्वरीत कालावधीत अशी वाहने ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल ट्रेलर इ. वाहने) अशा वाहनांना दि.28 ऑगस्ट 2025 रोजी 23 वाजेपासून दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत व दि.31 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 23 वाजेपासून ते दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत तसेच दि.2 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 23 वाजेपासून ते दि. 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वापर्यंत वाहतुकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहने दि.7 सप्टेंबर 2025 रोजी 20 वाजले पासून नियमित प्रवास करतील.
परंतु वरील निबंधबंदी दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन अन्न-धान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या रस्ता रुंदीकरण, रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. या संदर्भात वाहतुकदारांना संबंधित वाहतुक विभाग, महामार्ग पोलीस यानी प्रवेश पत्र देणे आवश्यक आहे.
गणेशत्सव काळात वाहतुक नियोजनाकरीता महाराष्ट्र शासनाने वरीलप्रमाणे आदेश निर्गमित केलेले असून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरून दि. 23 ऑगस्ट 2025 ते दि. 6 सप्टेंबर 2025 रोजीच्या मुदतीत प्रवास करणाऱ्या सर्व वाहन धारक वाहन चालकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. जड -अवजड वाहनाना बंदी घातलेल्या दिनांक कालावधीत त्यांनी महामार्गावरून प्रवास, वाहतुक करू नये. वाहनधारक वाहन चालक यांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून गणेशोत्सव काळात वाहतुक नियोजनाकरीता सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून करण्यात येत आहे.
गणेशोत्सव काळात प्रवाशांना वाहतुकी बाबत कोणतीही अडचण उद्भल्यास मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्ष, सिधुदुर्ग (02362/228200 मो.क्र.8275776216) किंवा जिल्हा वाहतुक शाखा, सिंधुदुर्ग (मो.क्र.8652522177) या नंबरवर संपर्क साधावा.
