You are currently viewing “श्री शनैश्चर देव”

“श्री शनैश्चर देव”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

*”श्री शनैश्चर देव”*

श्री शनैश्चर देवा आम्ही करितो वंदन
शरण आम्ही सर्वां द्यावे आशीर्वाद।।धृ।।

सूर्य देवाचे तेज संध्येला होईना सहन
सूर्य पत्नी संध्या छाया ठेवून गेली निघून
वैशाख आवसेला छायेला झाले पुत्र रत्न।।1।।

दोरी विंचू त्रिशूल शोभे चतुर्भुजांत
शिरी मुकुट धारी शोभे सूर्य नंदन
काळी काया कटि कद जटायू वाहन।।2।।

शनीचा भाऊ यमराज यमुना बहीण
गुरु शिव चहू बाजूला वलय तीन
आकाशी फिरताना सोबत जाई घेऊन।।3।।

पिंपळ वृक्षाला करावे सदा जलार्पण
शनी महादशेची पिडा टळे करू नमन
शनी घडवी आयुष्याचे उघडे दर्शन।।4।।

शनीला भावते विनम्रता धर्माचरण
शनी दाविती संसाराचे असारपण
विघ्न हर्ता शक्ती देई करण्या सहन।।5।।

श्री अरुण गंगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा