You are currently viewing गणेशोत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप

गणेशोत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप

*गणेशोत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी कसाल ग्रामपंचायत येथे सकाळी ठीक 11 वाजता सालाबादप्रमाणे याहीवर्षी दिव्यांग बांधवांना गणेशोत्सवानिमित्त भेटवस्तू वाटप करण्यात आले.यावेळी संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, डॉ. मिलिंद बोर्डवेकर, कसाल गावचे सरपंच राजन परब सर, कसाल ग्रामपंचायत कर्मचारी निर्गुण सर, प्रकाश वाघ, प्रकाश सावंत, विजय कदम, बाबुराव गावडे, चंद्रकांत चव्हाण, शंकर नाईक, रंजना इंदुलकर, प्रशांत कदम, यशवंत सदडेकर सुशाली सदडेकर, सुहास रेवडेकर, संस्था कर्मचारी प्रणाली दळवी, विशाखा कासले, हर्षद खरात, सिद्धेश माळकर, विठ्ठल शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने स्वागत समारंभ करून साईबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर शिंगाडे सरानी उपस्थित दिव्यांग बांधवांचे स्वागत केले. व त्यानंतर डॉ. मिलिंद बोर्डवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व असेच कायम शिंगाडे सराच्या पाठीशी उभे राहून कायम त्यांना साथ द्या असे उदगार व्यक्त केले.व या कार्यक्रमाला सहकार्य केले.तसेच कसाल गावचे सरपंच परब सर यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. व परब सर यांनी देखील या कार्यक्रमाला सहकार्य केले. त्यानंतर रक्षाबंधन कार्यक्रम करण्यात आला. रक्षाबंधन कार्यक्रम झाल्यावर सरपंच परब सरांच्या व डॉ. बोर्डवेकरांच्या उपस्थितीत वस्तू वाटप कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर सर्व दिव्यांग बांधवांना साईकृपा संस्थेच्या वतीने नाश्ता देण्यात आला.त्याचबरोबर यशवंत सदडेकर यांनी हेल्थ विषयी माहिती सांगितली. दिव्यांग बांधवांची हेल्थ तपासणी केली. या कार्यक्रमाला ज्या ज्या व्यक्तीचे सहकार्य लाभले त्या सर्व बांधवाचे संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी साईकृपा संस्थेच्या वतीने आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा