You are currently viewing दादर येथे नामवंताच्या संदेश पत्रांचे प्रदर्शन

दादर येथे नामवंताच्या संदेश पत्रांचे प्रदर्शन

तळेरेतील संदेशपत्र संग्राहक निकेत पावसकर यांचाही समावेश

तळेरे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या संग्रहाचे प्रदर्शन दादर मुख्य पोस्ट कार्यालयाच्या वतीने आयोजित केले आहे. 13 फेब्रुवारीला हे प्रदर्शन असून सकाळी 9 ते रात्रौ 8 वा पर्यंत खुले असणार आहे.

दादर मुख्य पोस्ट कार्यालयाची वार्षिक सत्यनारायण पुजेनिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थीत राहणार आहेत. या प्रदर्शानामध्ये देश परदेशातील राष्ट्रीय आंतररष्ट्रीय स्तरावरील अनेक नामवंतांच्या संदेश पत्रांचा समावेश आहे. यानिमित्ताने सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, शास्त्रज्ञ, कलावंत, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, खेळाडू, छंदिष्ट्य, धार्मिक या क्षेत्रातील देश आणि परदेशातील  जागतिक किर्तिच्या व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रे पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांसह संस्कृत, कोकणी, चायनीज, मोडी, उर्दू आणि ब्रेल भाषेतील पत्रे पहावयास मिळतील. अनेक नामवंतांना आपण पाहतो, अनेकदा त्यांचे विचार ऐकतो. मात्र, त्याची स्वाक्षरी कशी असेल? त्यांचे हस्ताक्षर कसे असेल? याबाबत अनेकदा कुतुहल असते. या प्रदर्शनामध्ये अशा अनेक व्यक्तींची हस्ताक्षरे आणि स्वाक्षरी पाहता येणार आहेत.

हे प्रदर्शन म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा असून विनामुल्य पहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाला  भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

फोटो : निकेत पावसकर

प्रतिक्रिया व्यक्त करा