“गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भजनी मंडळांसाठी २५ हजारांचे महाअनुदान
पालकमंत्री नितेश राणेंना भजनी कलाकारांकडून आभार”
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने भजनी मंडळांना २५ हजार रुपयांचे महाअनुदान जाहीर केले आहे. या निर्णयामुळे अनेक भजनी कलाकारांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
हा निर्णय घेण्यासाठी विशेष पुढाकार घेणारे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांची भेट घेऊन विविध भजनी मंडळांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
