You are currently viewing दिव्यांग बांधवांचा मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा मेळावा संपन्न

*दिव्यांग बांधवांचा मेळावा संपन्न*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल सिंधुदुर्ग व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 22/08/2025 रोजी तळवडे व होडवडे या गावातील दिव्यांग बांधवांचा मेळावा सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये तळवडे गावचे सरपंच वनिता मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य गजानन जाधव, वेलनेस हेल्थ तपासणीचे यशवंत सदडेकर, सुशाली सदडेकर,सुहास रेवडेकर, तसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, संस्था कर्मचारी विशाखा कासले,संजना गावडे, हर्षद खरात,दिव्यांग बांधव प्रभाकर केरकर, व सीताबाई सावंत, संतोष वराडकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. संस्था कर्मचारी कासले मॅडमानी संस्थेचे अहवाल वाचन केले.वेलनेस हेल्थचे सदडेकर सर यांनी हेल्थ विषयी माहिती सांगितली व मोफत हेल्थ तपासणी केली. पंधरा दिव्याग बांधवांचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे घेतली. दोन शालेय विद्यार्थ्याना दप्तर देण्यात आले.या मेळाव्याला 40 हून जास्त दीव्यांग उपस्थित होते. संस्था कर्मचारी गावडे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा