You are currently viewing “ओसरगाव बोर्डवे शाळेत वह्या वाटप कार्यक्रम – वकील सुमेध नाडकर्णी यांचा सौजन्यपूर्वक उपक्रम”

“ओसरगाव बोर्डवे शाळेत वह्या वाटप कार्यक्रम – वकील सुमेध नाडकर्णी यांचा सौजन्यपूर्वक उपक्रम”

“ओसरगाव बोर्डवे शाळेत वह्या वाटप कार्यक्रम – वकील सुमेध नाडकर्णी यांचा सौजन्यपूर्वक उपक्रम”

ओसरगाव
ओसरगाव येथील बोर्डवे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कलमठ गावचे खोत तथा वकील श्री. सुमेध सतीश नाडकर्णी यांच्या सौजन्याने आठवी, नववी आणि दहावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन श्री. नाडकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, “भरपूर शिका, मोठे व्हा आणि कधीही आपल्या आई-वडिलांना विसरू नका,” असा प्रेमळ संदेश दिला.

विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा