*कणकवली तालुक्यात मटक्यावर धाड टाकणाऱ्या पालकमंत्री नितेश राणे यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन.*
*भविष्यातही अशाच प्रकारे स्वतःच्या तसेच मित्र पक्षातील अवैद्य धंदे करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर धाड टाकण्याचे धारिष्ट्य पालकमंत्री नितेश राणे दाखवतील का :-मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.*
आज पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली मध्ये अनधिकृत मटक्यावर स्वतः धाड टाकून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा किती निष्क्रिय आहे हे दाखवून दिल्याबद्दल तसेच स्वतः नितेश राणे यांनी मटक्यावर केलेल्या कारवाईसाठी मनापासून कौतुक आणि अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आग्रहाची मागणी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतर ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे अवैध्य धंदे सुरू आहेत. त्यापैकी बहुतांश अवैध धंदे हे पालकमंत्री नितेश राणे यांच्या स्वतःच्याच पक्षातील तसेच मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांमार्फत अनेक ठिकाणी सुरू आहेत त्यावर देखील अशाच प्रकारे कारवाई होणे अपेक्षित आहे. आणि यासाठी मनसे आपणास जिल्ह्यात इतर ठिकाणी जे अवैध धंदे करणारे आहेत त्यांची नावे पत्त्यासहित आपणांस देऊन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.

