You are currently viewing सरकारचा “GST” वाढवतात

सरकारचा “GST” वाढवतात

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सरकारचा “GST” वाढवतात*

 

नव्हते कोणी दोस्त बाजुला

*खेळत होतो बहीणीसंगे*

मातीच्या “कच्या” रस्त्यावर

धावाची आमची *पैज रंगे*…..1

 

कधी पडून चिखल उडायचा

वरती पाठीत *बोनस मिळे*

आड बाजूच्या त्या चाळीत

दोस्त रहायचा *अशोक टिळे*…2

 

कधी असायचे बूट पायात

बहुतेक पडायचे ते *उघडे*

खेडायावरची साधी रहाणी

दोस्त यायचे *उघडे बिघडे*….3

 

नव्हते कोणी कधी चिडत

पडले खाली *तरी रडत*

वृत्ती होती खिलाडू सर्वांची

फुटबॉल खेळून पदके कमवत .4

 

ही तर आमची सराव भूमी

सराव करायचा येथे *पेले*

विश्वात आपले नाव कमवत

बसतात आता *रिचवत पेले* ….5

 

काळीमा लावतात *खेळाला*

कधीही ढोसून माती खातात

दिवसा ढवळ्या तर्र असतात

*सरकारचा GST वाढवतात*..6

 

विनायक जोशी 🖋️ठाणै

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा