You are currently viewing श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यपुष्प – ३४ वे

श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यपुष्प – ३४ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

___________________________

श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यपुष्प – ३४ वे

श्री स्वामी भ्रमण गाथा…(अंबाजोगाई- महाराष्ट्र)

___________________________

सावकाराचे वऱ्हाड परतले । घरात सारे आनंदले । एक दिवस सारेच आले । स्वामी आजोबांच्या दर्शना ।।१।।

 

स्वामींनी वराला बोलाविले । त्यास कल्याण आशीर्वाद दिले। आचरण तू,शास्त्रानुसार पाहिजे ठेवले । पुढे प्रज्ञापुरी भेटीस यावे ।। २ ।।

 

काही दिवसांनी एक घडले । त्या सावकारपुत्रास स्मरण झाले । आता पाहिजे गेले । अक्कलकोटी स्वामींच्या दर्शना ।।३।।

 

तू आचरण आज्ञेचे पालन केले । मग इकडे येणे केले ।

हे योग्य झाले । आता परमार्थ मार्ग करावा संपादन ।।४।।

 

या साऱ्या कथेचा सार । मुलीचा मुलगा होणे,चमत्कार ।

वाटेल असे वारंवार । परी हे असे योग-सामर्थ्य ब्रह्मान्ड-नायकाचे ।।५ ।।

 

भ्रमणगाथा सुरूच आहे । पुढील प्रवासासाठी जाणे आहे। कार्य प्रबोधनाचे करणे आहे । स्वामी निघाले,दक्षिण भारताकडे ।।६ ।।

*****************

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे-पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा