You are currently viewing पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादीकडून भाजप केंद्र सरकारचा जाहीर निषेध..

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादीकडून भाजप केंद्र सरकारचा जाहीर निषेध..

चुलीवर भाकरी भाजून केंद्र सरकारचा निषेध…

सावंतवाडी
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कडून आज सकाळी सावंतवाडी उद्यानाच्या चौकात चुलीवर भाकरी भाजून केंद्र शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच जाहीर निषेध करण्यात आला. महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष उदय भोसले, सुरेश गवस, अफरोज राजगुरू, संदीप राणे, निधी पास्ते, सिद्धी परब, शुभांगी साटम, रंजना निर्मळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस कडून उस्फूर्त प्रतिसाद पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा