*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
हळव्या तुझ्या स्वरांनी..
हळव्या तुझ्या स्वरांनी
मन गलबलून येते
झोके पहा स्मृतींचे
मी कुंजवनात जाते..
तू कृष्ण मीच राधा
ना कसली होती बाधा
एकच फक्त वादा
तू प्रेमावीर साधा..
नव्हतेच जग सभोती
भवती न भवती होती
त्या प्रेमसागरात
होतेच फक्त मोती…
बसले फुले ओवित
गुंफून फुलमाला
बकुळही सोबतीस
क्षण होता सावलीला
गेले विरून दिन ते
जणू वस्त्र धागा धागा
उपयोग सांग काय
असतो करून त्रागा…
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
