*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मधे तडमडतोय वर्षाकाल*
निसर्ग बहरला तुला पाहुनी
हास्य पाहून जडली *प्रिती*
सर श्रावणाची *बिलगता*
कुंठीत होऊन जाई *मती*…1
हास्य पाहून होतो घायाळ
दयाळ दारात *गुटमळतो*
पेरू खायचा सोडून पोपट
विठू विठू म्हणाया विसरतो….2
घुमता पारवा वळचणिचा
उडून येतो तुझ्या *संगती*
असून “रिपरिप” पावसाची
तुला रीझवतो करून गमती….3
साळुंक्या अन मैना अगणित
फेर धरून तुझ्या भोवती
गातात गाणी *श्रावणाची*
लाभते त्यांना तुझी पसंती……4
कधी येणार आमचे वाट्याला
अनमोल गीतांचे श्रावण सुख
दुर्मिळ झालेय *दर्शन हल्ली*
पहात बसतेस *सूनमुख* ….5
नीळ्या शालुतील नीलराणी
अप्राप्य झालीय *आजकाल*
सवड नाही आम्हास भेटायला
मधे तडमडतोय *वर्षाकाल*..6
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157
