*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अजूनही शाळेच्या बाकावर…!*
*बालमैत्रीण..!!*
तशी ती माझ्यातून
कधीच गेली नव्हती
आजही माझी वाट पाहत
शाळेच्या बाकावर बसली होती..
डोळ्यांत एकमेकांच्या…प्रेम
कधीपासून …बघत होतो
बालमैत्रीणीला सांगायला हवं होतं
मी ….तुझ्याशी लग्न करतो..
गाठी निरगाठी सोडवता सोडवता
खूप काळ निघून गेला
दोघांच प्रेम ..अव्यक्त राहिलं
अक्षदा तिच्यावर टाकायचा क्षण आला
मेंदीत सजलेला हिरवा चुडा
हक्काने तो माझाचं होता
अजूनही जीव माझा
तिच्यातचं गुंतला होता …
मंगलाष्टकं संपेपर्यंत.. ती
माझ्याकडेचं …पाहत होती
अंतरपाट गळून पडताच..
बालमैत्रीण वर्गातून गेली होती
शाळातरं कधीच सुटली…
शेवटची घंटाही वाजली..
इतकी वर्ष उलटूनही..ती माझी
बाकावर वाट पाहत बसली..
आजही शाळेच्या बाकावर
ती माझी वाट पहात आहे….!!
बाबा ठाकूर धन्यवाद
इतकी वर्ष उलटून गेलीत ..
अजूनही शाळेच्या बाकावर
ती माझी वाट पाहत आहे..
ही आठवी रचना.सादरीकरणाची

