सिंधुदुर्ग : जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या आदेशानुसार अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शासकीय व खासगी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
याबाबतचे आदेशपत्र सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून प्रसारित करण्यात आले असून, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
