अंगणवाडी सेविकापदासाठी २९ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
देवगड तालुका अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी सेविका पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छूक व पात्र महिला उमेदवारांकडून दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प देवगड कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन देवगड एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी बाबली होडावडेकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालय देवगड. ०२३६२- २६२३१२ किंवा मोबा. ८९७५२४६०२६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधवा. असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

