*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वारा मारतो मधून शिट्ट्या*
भात खाचरे हिरवी हिरवी
गोधडी शिवली निसर्गाने
हात फिरवत हळूच वारा
गातो गाणे *अभिमानाने*…..1
रोमांच उठता तृण पात्यावर
वाटून जाते सागर लाट
चोरून घेती अंग जरासे
हिरवी पाने होता पहाट……….2
उंचावरून चाले टेहळणी
माडांचीही खुले आम
पत्ता नसतो तृण पात्यांना
रंगात येते त्यांची शाम…………3
सृष्टी नेसते हिरवा शालू
खट्याळ पाऊस भिजवतो
अभिषेक होतो चोवीस तास
पाऊस अखंड गाणे गातो……..4
छोटे मोठे ओहळ थकती
खेळून दमती आट्यापाट्या
स्पर्धा चालते बेडूक मामांची
वारा मारतो मधून *शिट्ट्या*…..5
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157
