अमरावती :
यावर्षी महाराष्ट्र राज्यातून जवळपास 93 मुले केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा उत्तीर्ण झालेली आहेत. आय ए एस परीक्षेच्या निकालाच्या संदर्भात महाराष्ट्र सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात आयएएसच्या निकालात तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी 25 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लागला आहे. त्यासाठी मिशन आयएएस सारख्या अनेक सेवाभावी संस्थांनी आपल्या परीने प्रयत्न केले आहेत. पहिल्या दोन क्रमांकामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश यांचा क्रमांक आहे. दरवर्षी या आयएएस झालेल्या मुलांचा सत्कार सुप्रसिद्ध सनदी अधिकारी व पासपोर्ट मन म्हणून प्रसिद्ध असलेले तसेच सुप्रसिद्ध लेखक असलेले डॉ ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढाकाराने दिल्ली येथे संपन्न होत असतो. त्यांची पुढचं पाऊल ही सेवाभावी संस्था या कार्यक्रमाचे दिल्लीला आयोजन करीत असते .यावर्षी आयएएस झालेला महाराष्ट्र राज्यातील सर्व मुलांचा सत्कार येत्या 20 ऑगस्ट रोजी दुपारी दोन तीस वाजता नवी दिल्ली कॅनेट प्लेस विभागामध्ये असलेल्या एनडीएमसी कन्व्हेशन सेंटर 15 संसद मार्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. या सत्कारासाठी विदर्भातून आयएएस झालेल्या मिशन आयएएस परिवारातील सर्वश्री अभिदा अनम यवतमाळ डॉ. जयकुमार आडे यवतमाळ श्री रजत पत्रे धामणगाव रेल्वे श्रीमती मोहिनी खंडारे पुसद श्रीमती नम्रता ठाकरे वरुड अमरावती डा. अभय देशमुख यवतमाळ श्रीमती भाग्यश्री नैकळे नागपूर श्रीरंग कावरे नागपूर श्रीमती मोहिनी सूर्यवंशी चाळीसगाव डॉ. शिवांग तिवारी धारणी श्रीतेज पटेल धुळे सचिन बिसेन गोंदिया व नागपूरचे सर्वश्री अपूर्व बालपांडे सवी बालकुंडे सर्वेश बावणे राहुल आत्राम यांचा समावेश आहे. या सर्वांचे मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे व विभागीय संचालक श्री रुपेश राठी यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या सात वर्षापासून डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत असून या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील आयएएस होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढेल व यावर्षी आयएएस झालेले विद्यार्थी ह्या सत्कारामुळे प्रेरित होऊन हा आय ए एस चा टक्का वाढविण्यासाठी हातभार लावतील असा या आयोजनामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमासाठी मिशन आय ए एस चे सर्व संचालक तसेच विभागीय संचालक दिल्लीला रवाना झाले आहेत.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस
अमरावती

