*श्री रामाचे चरित्र मानवी जीवन सुखकारक करते. – डॉ.विजय लाड
वैभववाडी
भगवान श्रीरामांच्या चरित्रातील अनेक प्रसंगांचे चिंतन आणि मनन केल्यास मानवी जीवनातील सर्व दुःख सहन करण्याची शक्ती मिळते आणि आयुष्य सुखकारक करण्यास मदत होते असे विचार ज्येष्ठ समर्थ भक्त डॉ.विजय लाड यांनी कल्याण येथील श्रीराम मंदिर येथे श्री राम कथा सप्ताह समारोप वेळी व्यक्त केले.
दिनांक सात ते तेरा ऑगस्ट या दरम्यान विजय लाड यांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या सगुणलीलांचे संकीर्तन श्रीराम कथेच्या माध्यमातून सादर केले. श्री रामजी मंदिर, पार नाका, कल्याण येथील विश्वस्त आणि दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाने ही श्री रामकथा आयोजित केली होती.
या कथेसाठी सौ. रंजना पाटील, मंगल बोरसे, सुप्रिया जोग, अभय पुराणिक, डॉ. अमोल नेवे, अंजली कार्लेकर, अपर्णा आपटे, प्रतिभा पायगावकर,प्राची भावे, रेवा देशपांडे, सोमनाथ पाटील, अशोक पाठक, सुनिता मोराणकर, सीमा पटवर्धन, सुरेखा गोखले, स्वाती मराठे, पुराणिक काका, प्रकाश लेले, प्रसाद चाफेकर, संदीप पळनिटकर, सौ. अमृता जोशी, रंजना पाठक, अपर्णा वांगीकर, शुभदा थिटे, सुचेता देशपांडे, नितीन निमकर यांनी परिश्रम घेतले.
या श्रीराम कथेसाठी खोपोली, पुणे, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ, येथील साधकांची उपस्थिती होती. महाप्रसादाने कथेच्या समारोपाची सांगता झाली.

