दोडामार्ग :
दोडामार्ग तालुक्यातील शासकीय ठेकेदार तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांना जनजागृती सेवा संस्थेतर्फे ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सहकार, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रांतील कार्यांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यानुसार दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला.
या पुरस्कारामुळे दत्ताराम टोपले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात येत आहे.
