You are currently viewing काय मिळविलेत बंद करून

काय मिळविलेत बंद करून

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*काय मिळविलेत बंद करून*

 

आधीच नाही घरात कोणी

पोष्ट करणार बंद पत्र पेटी

होता तीजवर जीव जडला

येते पोष्टा तुझीच *प्रीती*//1//

कु-हाड मारून पायावरती

काय मिळविलेस तू *सुख*

देणार शाप सर्व *म्हातारे*

पोष्टात जायचे दिले *दु:ख* //2//

तयार असायची *एव्हररेडी*

कोप-यावर निमूट *बसून*

तोंड उघडून सदैव हसायची

द्यायची सेवा कधी न रुसुन //3//

म्हाता-यांची *मैत्रीण लाल*

बंद करून *गळा घोटणार*

कसे धाडणार पत्र मैत्रीणीला

जीवाला लावला “मोठा घोर” //4//

ऐकून घ्यायची ती कैफियत

पाठीवर फिरवायची *हात*

टीप गळायची नयना मधून

ताटकळायची ऊन पावसात //5//

तंगड्या तोडत *कुठे* जायचे

शोधत आता पोष्ट ऑफीस

कुरीयरवाले ड्यांबीस सगळे

पैसे सांगतात पाचाचे पंचवीस//6//

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा