*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गोपाळकाला*
श्रावणात अष्टमी तिथीला
जन्म कारागृहातचि झाला
गोकुळ प्रसन्न ,आनंदित
बाळकृष्ण तोअवतरला। —१
यशोदेचा नटखट कान्हा
खोड्या करतसे रोज फार
बाललीला अलौकिक त्याच्या
यशोदा होई फार बेजार—-२
आनंदोत्सव गोकुळातल्या
यमुना नदीच्या तीरावरी
गोपगोपी समवेत कृष्ण
आनंदाने वाजवी बासरी–३
बाळकृष्ण वाढे गोकुळात
सवंगड्या सोबत वनात
करी गोपाळकाला मजेत
गोप गोपिकांच्या समवेत—४
यमुनेच्या तीरी रानामध्ये
कृष्ण वाजवितसे बासरी
नाद मधुर कानी पडता
राधा कशी थांबणार घरी? – ५
खेळ रंगला, कृष्ण दंगला
गोपाळकाला गोड झाला
कृष्ण देतसे मुखात घास
स्वर्गसुखाचा हर्ष मिळाला–६
प्रतिभा पिटके
अमरावती
