IND vs ENG 1st Test Live Updates | कर्णधार ज्यो रुटचं दीडशतक, इंग्लंडची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
वृत्तसंस्था:
IND vs ENG Live Cricket
Chennai 1st Test Live Updates | भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकली आहे. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाकडे सर्वांचे लक्ष आहे
इंग्लंडची धावसंख्या तीनशेपार, कर्णधार ज्यो रुटचं दीडशतक, बेन स्टोकही स्थिरावला, इंग्लंडची मोठ्या धावसंख्येकडे वाटचालभारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार ज्यो रुटच्या शतकाच्या बळावर इंग्लंडच्या संघाने 3 बाद 263 धावांपर्यंत मजल मारत खेळावर पूर्ण वर्चस्व राखलं आहे. पहिल्या सत्रात दोन गडी गमावल्यानंतर संपूर्ण दिवस सलामीवीर डॉम सिबली-जो रूट जोडीने खेळून काढला आणि संघाला भक्कम स्थितीत आणले. रूटने नाबाद शतक (128) ठोकलं, पण सिबली मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 87 धावांवर बाद झाला.इंग्लंडची धावसंख्या तीनशेपार, रुट दीडशतकाजवळ तर स्टोकही स्थिरावला, इंग्लंडचा स्कोर 3 बाद 313पहिल्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडची फलंदाजी भक्कम स्थितीतभारतीय संघाला मोठं यश. स्थिरस्थावर भागीदारी तोडण्यात बुमराहला यश. सिब्ले 87 धावांवर बाद.70 षटकांच्या खेळानंतर इंग्लंडची धावसंख्या 2 गडी बाद, 180 धावा. रुट आणि सिब्ले भारतीय गोलंदाजापुढं आव्हान उभं करताना164 चेंडूंमध्ये जो रुटचं शतक. 100 व्या कसोटीमध्ये झळकावलं शानदार शतक.जो रुटची शतकी खेळी. इंग्लंडची धावसंख्या 2 गडी बाद, 227 धावा. भारतीय गोलंदाज काहीसे अडखळताना दिसत आहेत.लंच ब्रेकआधी इंग्लंडला दोन धक्के, इंग्लंड 2 बाद 67 धावा, अश्विनने बर्न्सला तर बुमराहने लॉरेन्सला पाठवले तंबूत, बर्न्स 33 तर लॉरेन्स शून्यावर बाद64 षटकांच्या खेळानंतर इंग्लंडची धावसंख्या 2 गडी बाद 163 धावा. सिब्ले आणि रुटची शतकीय भागीदारीचहापानापर्यंत इंग्लंड 140 धावांवर 2 विकेट्स, दुसऱ्या सत्रात इंग्लंडचा दबदबा, सिब्ले 53 तर रुट 45 धावांवर खेळतोय.सुरुवातीच्या 12 षटकांनंतर इंग्लडने 26 धावा केल्या आहेत. त्यामध्ये बर्न्स 12 धावांवर तर सिबले 13 धावांवर खेळत आहेत. बुमराह आणि अश्विन गोलंदाजी करत आहेत.सलामीवीर सिब्लेचं अर्धशतक, इंग्लंडची धावसंख्या दोन बाद 125, सिब्ले (51)आणि रुटची (33) जोडी स्थिरावलीटीम इंडियाला जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी विश्चचषक (विश्व टेस्ट चॅम्पियनशिप) (डब्ल्यूटीसी) च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेत कमीत कमी दोन कसोटी जिंकणं आवश्यक आहे. इंग्लंड विरोधात जर भारतानं 1-0 नं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियासाठी फायनलला जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळं घरच्या मैदानावर इंग्लंडला 2-0 नं हरवणं आता टीम इंडियाला अत्यावश्यक झालं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. यात विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रिद्धिमान साहा, कुलदीप यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला आज सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाकडे सर्वांचे लक्ष आहे. या मालिकेत मोठा विजय मिळवणं अनेक कारणांसाठी महत्वाचं आहे.
चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर भारताची कामगिरी शानदार आहे. गेल्या 22 वर्षापासून टीम इंडिया या मैदानावर जिंकत आहे. परंतु या वेळी इंग्लंडचं भाराताला आव्हान असणार आहे, भारतीय संघ 1999 साली चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानकडून 12 धावांनी भारतीय संघ पराभूत झाला होता. या सामन्यानंतर संघाने 8 सामने या मैदानावर खेळले त्यातील 5 सामने जिंकले असून दोन सामने ड्रॉ झाले.