You are currently viewing ज्येष्ठ साहित्यिक प्रा तुकाराम पाटील यांचा सहस्त्रदर्शन सोहळा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ साहित्यिक प्रा तुकाराम पाटील यांचा सहस्त्रदर्शन सोहळा उत्साहात संपन्न

*ज्येष्ठ साहित्यिक प्रा तुकाराम पाटील यांचा सहस्त्रदर्शन सोहळा उत्साहात संपन्न -*

*नक्षत्र काव्य मैफल व पुस्तक प्रकाशन सोहळा*

नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालय, भोसरी,पुणे व
साईराजे पब्लिकेशन,पुणे आयोजित प्रा.तुकाराम पाटील(ज्येष्ठ कवी ,साहित्यिक,गझलकार ,कादंबरीकार,कथाकार समीक्षक, नाटककार चिंचवड पुणे) यांचा सहस्रदर्शन सोहळा अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाला . *प्रा. तुकाराम पाटील* लिखित *वेदनेच्या अवतीभवती* या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.८१ व्या वाढदिवसानिमित्त ८१ कवितांचा समावेश असलेला दर्जेदार काव्यसंग्रह,साईराजे पब्लिकेशन ,पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आला

या कार्यक्रमाचे अध्यक्ष
*श्री राज अहिरराव* (ज्येष्ठ साहित्यिक ,गझलकार , निगडी), कार्यक्रमाचे उद्घाटक *मा. प्राचार्य श्री डॉ. पांडुरंग भोसले*
(प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी व विचारवंत ,) पुणे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यावरणचा संदेश देत, वृक्ष पूजन व वृक्षाला पाणी घालून करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.पांडुरंग भोसले म्हणाले की, ” साहित्याच्या अभ्यासकांनी भाषेला समृद्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आजच्या काळाची गरज आहे .आपले जीवन साहित्याने सुखी, समृद्ध ,व संपन्न आणि ख-याअर्थाने परिपूर्ण होते .आणि वेगळ वेगळ्या माध्यमातून ते आनंद देत असते. ”

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राज अहिरराव आपल्या मनोगतात म्हणाले, ” एका ज्येष्ठ साहित्यिकाचा सहस्त्रदर्शन सोहळा म्हणजे जीवनातील महत्वाच्या आणि आनंदाचा क्षण असतो. यामुळे त्यांनी केलेल्या साहित्य सेवेची ती एक पोहच पावती असते. या परिसरातअनेक साहित्यिक आणि कवी घडवण्याचं महानकार्य पाटील सरांनी आयुष्यभर केला आहे. अनेक साहित्य निर्मितीतून त्यांनी माय मराठीची सेवा केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील साहित्य संपदेला वैभवाकडे घेऊन जाण्याचे काम केले आहे. चांगल्या सत्संगामुळे जीवन समृद्ध होते.” तो सतसंंग देण्याचे काम पाटील सरांनी तन्मयतेने केले आहे.

प्रा. तुकाराम पाटील यांच्या सहस्रदर्शन सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली व काव्यरचना सादर केल्या त्यात संदीप तापकीर, नंदकुमार मुरडे
प्रा. प्रकाश कटारिया, सुरेश कंक, संभाजी बारणे, सुभाष चव्हाण, जगन्नाथ कांबळे, प्रा संपत शिंदे, प्रा पी बी शिंदे,राजेंद्र पगारे,मुरलीधर दळवी, तानाजी एकोंडे,जयश्री गुमास्ते, वर्षा बालगोपाल, महमूदा शेख,बबन चव्हाण, सीमा पाटील,
डाॅ. अनुराधा मराठे,मंगला पाटील, डाॅ श्रीश पाटील ,,मुजफ्फर इनामदार ,सुनंदा कांबळे, योगिता कोठेकर, आराध्य मराठे, ,देवदास मराठे, कविता कांबळे हे सहभागी झाले . प्रमुख उपस्थिती मध्ये विविध संस्था पदाधिकारी स्नेही मंडळी उपस्थित होते.सदर कार्यक्रम सायन्स पार्क नाट्यगृह (एसी.),चिंचवड पुणे येथे उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी वादळकार यांनी केले. व आभार प्रदर्शन बबन चव्हाण यांनी केले. या उत्तम कार्यक्रमाचे आयोजन संयोजन प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नक्षत्राचं देणं काव्यमंच यांनी केले होते.
यावेळी प्रत्येक सहभागी ला आकर्षक सन्मानपत्र, गुलाबपुष्प व पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी प्रा. तुकाराम पाटील यांना मानपत्र,पुणेरी पगडी, मानाचे भरजरी वस्त्र, स्मृतिचिन्ह,शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ,मोत्याची माळ देऊन त्यांचा योग्य अशा प्रकारचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून टाळ्यांच्या गजरात हा सहस्रदर्शन सोहळा आनंदी वातावरणात संपन्न झाला. या
आनंदाच्या सोहळ्यामध्ये सत्कारमूर्ती भारावून गेले.

कार्यक्रमाची सांगता विश्वगीत पसायदानाने करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा