राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या ध्वजावंदनाचा बहुमान सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधवला.
सावंतवाडी
राजा शिवाजी चौक मित्र मंडळ हे 65 वर्षापूर्वीच मंडळ आहे आणि या मंडळाच्या वतीने आजही अनेक सेवाभावी सामाजिक उपक्रम राबवले जातात या मंडळातील कार्यकर्त्याला संकटकालीन मदतीचा हात दिला जातो येथे उच्च- निच्य असा भेदभाव केला जात नाही प्रत्येकाने या मंडळाकडून प्रेरणा घ्यावी असे हे मंडळ आहे.
येथे प्रत्येक मंडळातील कार्यकर्त्याला एक मोलाचे स्थान दिले जाते प्रत्येक कार्यकर्त्याचा आदर केला जातो मंडळात मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन काटेकोरपणे केले जाते.
मंडळाच्या मीटिंगमध्ये यावर्षी ठराव घेण्यात आला की सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव समाजसेवेचे काम सर्वोत्कृष्ट करत आहे आणि अशा माणसाला या वर्षी ध्वजावंदनाचा मान द्यावा असे राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर व मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर सचिव दीपक सावंत व इतर पदाधिकाऱ्यांनी एकमताने निर्णय घेऊन ध्वजावंदनाचा जो बहुमान दिला तो बहुमान रवी जाधव यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा मान आहे अशा शब्दात रवी जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ध्वजावंदनाचा मान मिळणे हे काय सर्वसामान्य गोष्ट नसून यासाठी आपलं कर्तुत्व सिद्ध कराव लागत राजा शिवाजी चौक मित्र मंडळाणे ते जाणलं आणि रवी जाधव यांच्या आयुष्यामध्ये एक अविस्मरणीय आठवण दिली आहे.
यासाठी रवी जाधव यांनी राजा शिवाजी मित्र मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, अध्यक्ष बंटी माठेकर ,सचिव दीपक सावंत व सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
