*वेंगुर्लेत ‘ऑपरेशन सिंदूर’ पदयात्रेत उत्साहाचा जल्लोष*
*वेंगुर्ले शहरात तिरंगा पदयात्रेने* *देशभक्तीमय* *वातावरण*
वेंगुर्ले
भारतीय जनता पार्टी च्यावतीने वेंगुर्लेत ‘ऑपरेशन सिंदूर’ पदयात्रा उत्साहात पार पडली. ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे औचित्य साधत आयोजित या रॅलीने वेंगुर्ले शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
पदयात्रेचा सकाळी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय येथे प्राचार्य डाॅ. गोस्वामी सरांनी प्रारंभ केला. महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या छोटेखानी समारंभात जिल्ह्यातील निवृत्त सैनिकांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सैनिकांच्या योगदानाचा उल्लेख करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यानंतर निवृत्त सैनिकांच्या नेतृत्वाखाली तिरंगा हातात घेतलेले एनसीसी कॅडेट्स, शिक्षक, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. घोषणाबाजी, देशभक्तीपर गीते आणि ‘हर घर तिरंगा’चे संदेश देत रॅली शहरातून मार्गक्रमण करत वेंगुर्ला तहसील कार्यालय येथे पोहोचली.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई म्हणाले, “आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या वीरांचा सन्मान हा समाजाचा सन्मान आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियान हे फक्त झेंडा फडकवण्याचे नव्हे, तर देशभक्तीची भावना प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचे कार्य आहे.”
रॅलीदरम्यान नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून टाळ्यांच्या गजरात सैनिकांचे स्वागत केले. संपूर्ण शहरात तिरंग्याचा झेंडा आणि देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण भारून गेले होते.
या तिरंगा पदयात्रेत भाजपा तालुकाध्यक्ष विष्णु परब , प्रदेश निमंत्रीत शरदजी चव्हाण , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , मा.तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , उद्योजक सुधीर झांटये , ता.सरचिटणीस वसंत तांडेल , अँड.सुषमा खानोलकर , सुरेंद्र चव्हाण , प्रा.डॉ.सचिन परुळकर सर, महीला मोर्चाच्या सुजाता पडवळ , श्रेया मयेकर , वृंदा गवंडळकर , आकांक्षा परब , नामदेव सरमळकर , मनवेल फर्नांडिस , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , हेमंत गावडे , पींटु सावंत , संतोष सावंत , नामदेव सरमळकर , प्रमोद वेर्णेकर , नागेश वेंगुर्लेकर तसेच अनेक भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते .
