ग्रामस्थांना मिळणार ५ गुंठे कमर्शियल व ५० गुंठे शेतजमीन
सावंतवाडी :
गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेला गेळे कबूलयतदार जमिनीचा प्रश्न अखेर सुटला आहे. प्रत्येक ग्रामस्थाला ५ गुंठे कमर्शियल व ५० गुंठे शेतजमीन आता वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून स्वातंत्र्यदिनाच्याच दिवशी गाव स्वातंत्र्य झाल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे, अशी माहिती युवा नेते संदीप गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र शासन म्हणून नोंद असलेली जमीन ग्रामस्थांना मिळाली आहे. आता “खाजगी वन” म्हणून शेरा असलेल्या जमिनी मिळवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. शक्तिपीठ महामार्ग गावातून गेल्याने १२२ हेक्टर जमीन वगळण्यात आली असून त्याचा उपयोग पायाभूत सुविधांसाठी होणार आहे.
पत्रकार परिषदेत संदिप गावडे सह शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, गेळे सरपंच सागर ढोकरे, दिलीप भालेकर, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
