You are currently viewing अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा तत्पर सनदी अधिकारी

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा तत्पर सनदी अधिकारी

महसूल पंधरवाड्यानिमित्त प्रशासनातील दीपस्तंभ

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा तत्पर सनदी अधिकारी

 

सनदी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांच्या दालनात शिरण्यापूर्वी मी अभ्यागात कक्षामध्ये नजर टाकली. स्वागत कक्षामध्ये पुस्तके ठेवली होती .त्याचप्रमाणे त्या दिवसाचे वर्तमानपत्र ठेवले होते. याशिवाय फुलांचा एक शो पीस गुच्छ पण ठेवला होता. पुस्तके पाहून मला चांगलेच वाटले. मी पुस्तके चाळली. ती वाचनीय होती. तेवढ्यात बेल वाजली. मॅडमनी मला आत बोलावले होते. मी माझ्या बरोबरचे सहकारी श्री प्रशांत भाग्यवंत सोनाली बुंदे श्री अनिल मोहोड यांना घेऊन आतमध्ये गेलो. मॅडमनी आम्हाला बसायला सांगितले.

 

आणि खुर्च्यावर बसताच पाणी आले .मी विभागीय आयुक्त मॅडमनी दिलेला कागद सौम्या मॅडमकडे सोपविला. मॅडम म्हणाल्या मला आत्ताच कमिश्नर मॅडमचा फोन आलेला आहे. त्यांनी मला आपल्याबद्दल सांगितले आहे. आपण हा उपक्रम आपल्या परिसरामध्ये राबवू.

 

त्यांनी लगेच फोन करून शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री रवींद्र काटोलकर व शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती गुरव यांना बोलावून घेतले. आमचा मिशन आय.ए.एस.चा प्रकल्प पूर्ण समजावून घेतला. संबंधित उपक्रम आपल्या विभागात राबवायच्या आहे असे त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले. आम्ही सौम्या मॅडमचा निरोप घेतला.

काही कारणास्तव मी नागपूरला गेलो होतो. सौम्या शर्मा तेव्हा नागपूरला नागपूर जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. आम्ही नेहमीप्रमाणे कर्तव्यदक्ष विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांना भेटावयास नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात गेलो. मिशन आयएएस हा उपक्रम आम्हाला नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा व गोंदिया या 6 जिल्ह्यात राबवायचा होता. त्यासाठी मी रितसर पत्र विभागीय आयुक्त नागपूर यांच्या नावाने टंकलिखित करून आणले होते. विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरीमॅडमची अगोदरच वेळ घेतल्यामुळे त्यांची लगेच भेट झाली. त्यांना आमचा हा प्रकल्प आवडला. त्या म्हणाल्या आपल्या नागपूर जिल्ह्यापासून सुरुवात करू या. तुम्ही असं करा आमच्या कार्यालयाच्या बाजूलाच नागपूर जिल्हा परिषद आहे. तिथे सौम्या शर्मा आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेल्या आहेत. असे म्हणून त्यांनी फोन उचलला. आणि फोनवर लगेच सौम्या शर्मा यांना हा प्रकल्प नागपूर विभागात राबविण्याचा सूचना केल्या. बिदरीमॅडम म्हणाल्या तुम्ही असं करा हे पत्र असेच असे सौम्या शर्मा मॅडमकडे घेऊन जा. मी त्यांना तशा सूचना केलेल्या आहेत.

आम्ही बिदरीमॅडम कडील चहापाणी आटोपल्यावर नागपूर जिल्हा परिषद परिसरात गेलो .नागपूरची जिल्हा परिषद ही विभागीय आयुक्त कार्यालयाला लागूनच आहे. मी माझे विजिटिंग कार्ड आत मध्ये पाठवले. तोपर्यंत आम्ही स्वागत कक्षाचे निरीक्षण केले.

सौम्या शर्मा मॅडमनी मिशन आयएएस नागपूर जिल्ह्यात राबविण्यासाठी तत्पर निर्णय घेतला होता.

म्हणतात ना

 

जितने वाले कोई अलग काम नही करते

वहा हर काम अलग ढंग से करते है

 

गेल्या दोन वर्षात आम्ही अमरावती जिल्ह्याबरोबर नागपूर जिल्हा त्याचबरोबर नागपूर विभागातील अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्पर्धा परीक्षा कार्यशाळांसाठी पिंजून काढला .आमच्या या उपक्रमात माझी लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई ह्या देखील सहभागी झाल्या होत्या .नागपूर जिल्हा म्हणजे मोठा जिल्हा .पण श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मिशन आय ए एस हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यात व विभागात सुरू झाला.

नागपूर विभागात कार्यक्रम म्हणजे राहणे जेवणे आले. वाहनाचा खर्च आला. आमच्या नियमात तर आम्ही मानधन प्रवास खर्च घेत नाही. पण या कामात आमचे नागपूरचे मित्र मदतीला आले. नागपूरचे अपर आयुक्त श्री रवींद्र ठाकरे महाज्योतिचे महासंचालक श्री राजेश खवले उपायुक्त श्री कमल किशोर फुटाणे कर्नल राजू पाटील महाराष्ट्र बँकेचे श्री मोहन टोंगे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अरविंद गिरी पोलीस निरीक्षक श्री संजय पांडे प्रा. रमेश पिसे अनिल आसेगावकर अनिल मोहोड प्रशांत भाग्यवंत सोनाली बुंदे अभिजीत मानकर डॉ. हर्ष यादव कुलगुरू प्रकाश घवघवे कुलगुरू सुभाष चौधरी मा आर टी ओ अधिकारी श्री शरद जिचकार आर टी ओ अधिकारी श्री रवींद्र भुयार हे मदतीला आले. आणि एक चांगला प्रकल्प अमरावती बरोबर नागपूर विभागातही सुरू झाला. या चांगल्या प्रकल्पाची सुरुवात झाली ती श्रीमती सौम्या शर्मा यांच्या पुढाकाराने. आज सौम्या शर्मा अमरावतीला महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून रुजू झाल्या आहेत. रुजू झाल्याबरोबर मावळते आयुक्त श्री सचिन कलंत्रे यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना रितसर कार्यभार दिला. सौम्या शर्मा व त्यांचे यजमान अर्चित चांडक हे दोघेही चांगल्या गोष्टीसाठी समाज माध्यमावर चर्चेत आहे. श्री अर्चित चांडक हे अकोला येथे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असून परवाला अमरावती पोलीस आयुक्तालयात ते नवीन पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया यांना भेटून गेले. तेव्हा अमरावतीच्या पोलीस आयुक्तालयात भेटीचा योग आला होता .

अमरावती शहराला एक चांगला कर्तव्यदक्ष तत्पर महानगरपालिका आयुक्त लाभल्याबद्दल अमरावतीकर भाग्यवान आहेत. आतापर्यंत सौम्या शर्मा यांनी आपल्या अल्प कालावधीमध्ये आपल्या कामाची झलक नागपूर विभागामध्ये रुजविली आहे. अमरावती शहराचा कायापालट करण्यामध्ये त्यांची निश्चितच आयुक्त म्हणून महत्त्वाची भूमिका राहील. आपण देखील अमरावतीकर नागरिक म्हणून त्यांच्या चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांना सहकार्य केले पाहिजे.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा