You are currently viewing कुडाळ येथे गणेशोत्सवानिमित्त आत्मनिर्भर प्रदर्शन व खरेदी महोत्सवाला सुरुवात

कुडाळ येथे गणेशोत्सवानिमित्त आत्मनिर्भर प्रदर्शन व खरेदी महोत्सवाला सुरुवात

कुडाळ : नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून कुडाळ येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित आत्मनिर्भर प्रदर्शन व खरेदी महोत्सवाचे उद्घाटन मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग नितेश राणे यांच्या शुभहस्ते शुक्रवारी दुपारी झाले. हे प्रदर्शन १७ ऑगस्टपर्यंत महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे रोज दुपारी ३ वाजल्यापासून सुरू राहणार आहे.

उद्घाटनप्रसंगी नर्मदाआई संस्थेच्या अध्यक्षा सौ. संध्या तेरेसे, जिल्हा कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लवू म्हाडेश्वर, भाजप जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास उद्योजक प्रसाद तेरेसे, संस्थेच्या सचिव श्रीमती दीप्ती मोरे, संचालिका श्रीमती जान्हवी मोरे, सौ. प्राजक्ता तेरेसे, सौ. मृणाल देसाई, सौ. अक्षता कुडाळकर, सौ. अनुजा तेरेसे, सौ. आरती पाटील, सौ. साधना माडये, सौ. तेजश्विनी वैद्य, सौ. विशाखा कुलकर्णी, भाजप मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, पप्पा तवटे, सुनील बांदेकर, मोहन सावंत, सचिन काळप, माविम जिल्हा समन्वय नितीन काळे साहेब, तन्मय वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा