You are currently viewing स्वातंत्र्य दिनानिमित्त मांडकुली-केरवडे येथे ७७ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

स्वातंत्र्य दिनानिमित्त मांडकुली-केरवडे येथे ७७ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

‘संकल्प शिवप्रतिष्ठान’चा उपक्रम कौतुकास्पद

 

कुडाळ / मांडकुली :

७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त प. पुज्य अप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली–केरवडे व जिल्हा परिषद शाळा मांडकुली या दोन्ही शाळांमधील ७७ विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम संकल्प शिवप्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन वह्या व एक पेन भेट म्हणून देण्यात आले. “शबय” च्या निधीतून हा स्तुत्य शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी जय हिंद – जय शिवरायच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

प्रतिक्रिया व्यक्त करा