साटेली-भेडशी ग्रामपंचायत सदस्य सुमन डिंगणेकर यांचा महायुतीत प्रवेश
शिवसेनेचा विरोध, अहवाल जिल्हा नेतृत्वाकडे – शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस
दोडामार्ग
साटेली-भेडशी ग्रामपंचायत सदस्य सुमन डिंगणेकर (पूर्वी शिंदे गट) यांनी महायुतीत प्रवेश घेतल्याची माहिती मिळाली. यावेळी पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रशासकीय पातळीवर हा प्रवेश झाला.
डिंगणेकर या सध्या साटेली उपसरपंच पदावर कार्यरत असून, त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठा प्रभाव पडल्याचं मानलं जात आहे. महायुतीमध्ये आधीच असलेल्या स्थानिक नेत्यांमध्ये यामुळे अस्वस्थता निर्माण झाली असून, प्रवेशाबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.
दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भाजप प्रशामध्ये अशाप्रकारे शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आल्यामुळे स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांत नाराजी आहे.
शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ग्रामपंचायत सदस्य सुमन डिंगणेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश शिवसेनेच्या प्रमुखांना विश्वासात न घेता करण्यात आला. याबाबत जिल्हाप्रमुख व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे.”
या प्रवेशामुळे महायुतीच्या अंतर्गत संघटनात्मक समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या काळात स्थानिक राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
