You are currently viewing मला भावलेला कृष्ण

मला भावलेला कृष्ण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*मला भावलेला कृष्ण*

 

गेली पाच हजार वर्षे भारतीय स्त्री-पुरूषांच्या व्यक्त-अव्यक्त मनांचा तळठाव व्यापून उरलेली एक सशक्त विभूती रेखा… एक युगपुरूष श्रीकृष्ण

एक बहुआयामी व क्षणात म्हटलं तर स्वतःलाच दर श्वासागणिक स्पष्ट जाणवणा-या जिवलगांचा व क्षणात निळभोर आकाश व्यापून अवकाशपार जाणा-या वजनरहित ब्रम्हांडच व्यापणा-या ऊर्जा केंद्राचं केंद्र असलेले मोरपंखी कालजयी अजय व्यक्तिमत्व… मला भावलेलं..

जसं जसं सखोल चिंतन करत गेले तेव्हा प्रकर्षानं स्पष्ट होत गेलं की श्रीकृष्ण अधिकाधिक आयामांसह अंश मात्राने समजून घेणं मूकपणे शक्य आहे.. अगदी जन्माच्या क्षणापासून असा एकही दिवस व क्षण जात नाही की ज्याच्या साक्षीनं काही ना काही घडत नाही.. सर्वांर्थानं जीवन घडविणारी ही विभूती आहे.. जिथं जिथं म्हणून जीवन बिघडवणा-या दृष्ट व अशीव शक्ती आडव्या आल्या त्या त्यानं चाणाक्ष दूरदृष्टीच्या बुद्धियोगानं प्रथम अचूक हेरल्या मग जराही विलंब न लावता त्या समूळ निपटून काढल्या.. वेगवेगळ्या बुद्धिकुशल मार्गांनी त्या निपटताना त्यानं दरवेळी आपल्या थक्क करणा-या पौरूषाचा सर्वस्वी नवाच अकल्पित आविष्कार घडविला.. दरवेळी एकच शस्त्र व एकच उपाय नाही तर प्रत्येक प्रसंगी वातावरणानुसार योग्य उपाय त्यानं हाताळला..वाढ व विकास या जीवनाच्या मूलभूत लक्षणांच्या आड येणा-या दुष्ट शक्ती नुसत्या निपटणं म्हणजे प्रत्यक्ष जीवन घडवणं ठरतं का ? नाही तर ती जीवनातील स्पष्ट एकारलेली नकारात्मक दृष्टी ठरते..

श्रीकृष्णानं जीवन घडवणारी जी सकारात्मक दृष्टी ती पावलोपावली ज्या डोळसपणे राबविली ती मला आजच्या ज्ञान-विज्ञान या युगात फार मोलाची वाटते…

जीवनात भेटलेल्या हजार लाखो स्त्री- पुरूषांशी तो निखळ बावन्नकशी प्रेमयोगानचं वागला.. श्रीकृष्णच्या आठ राण्यांपैकी एक आदिवासी कन्या होती.. ऋक्षवान पर्वतातील जांबवान या आदिवासी राजाची कन्या जाबवंती

ही होय.. व्यक्तिगत जीवनात जाबवंती ही एक आदिवासी कन्या.. विवाह करून तिला द्वारकेत आणणारा व पत्नी म्हणून गौरवाचे स्थान देणारा हा एकमेव श्रीकृष्णचं…

राजसूय यज्ञात आमंत्रितांची उष्टी पानं उचलणारा, आपल्या गरूडध्वज रथाच्या चारही घोड्यांना स्वतः खरारा

करणारा, सारथी दारूक याला रथाच्या मागील घेरात विचार करायला सांगून स्वतः वेग सावरून “गरूडध्वज

रथाचं सारथ्य करणारा श्रीकृष्णचं..

इतकचं नाही तर गरीब सुदाम्याशी असलेला निरपेक्ष स्नेह, दारूक याच्याशी असलेला मनोभाव, गोकुळातील गोप-गोपिकांशी असलेला त्याचा निकोप मनमेळ याला आपण काय म्हणू शकतो ? अश्या त्याच्या या व्यक्तिमत्वाने माझ्या मनाला स्पर्श केला…

” गीता” तत्वज्ञानाचा सर्वश्रेष्ठ अधिकार

गीता ही महाभारताच्या कथासागरातील अशी मौल्यवान घागर आहे की जिच्यातील थेंबाथेंबात मानवी जीवनाचा सागर शब्दशः घुसळून काढण्याचं सामर्थ्य आहे..

श्रीकृष्णाचे मानलेले सखे अनेक आहेत.. त्याची मोठी नामावली आहे

उद्धव हा त्याचा चुलत बंधू.. तो तर त्याचा “परमसखा ” केवळ त्याच्यासाठीच गीते नंतर ” उद्धवगीता” त्यानं सांगितली.. युद्धानंतर एकट्या

उद्धवाची व्यक्तिगत सेवा श्रीकृष्णानं शेवटपर्यंत स्वीकारली ती का ? असा प्रश्न आजवर कुणीही उभा केला नाही व मलाही तो अजून ज्ञात झाला नाही..

उद्धव हा श्रीकृष्णाचा भावविश्वस्त होता.. हे चिंतनान मला सर्वाधिक स्पर्शून गेलं… नवं आकलन स्पर्शून गेलं… त्याचं व्यक्तिमत्व आत-बाहेर वेगवेगळं दिसू लागतं.. वेगळ्याचं भाषेत बोलू लागतं…

१) अंतःपुरी कक्षात मनापासून बोलला तो प्रिय पत्नी रुक्मिणीशी

२) ” स्त्रीत्व ” या जीवन सत्यासंबंधी वाद- विवाद, भ्रमण,संभाषण झालं ते सखी द्रौपदीशी

३) त्याच्या प्रिय ” गरूडध्वज ” रथावर होता तेव्हा बोलला ते सखा अर्जुनाशी

४) द्वारकेत कुरूक्षेत्रावरच्या शिबिरात त्याने मनःपूर्वक सल्लामसलत केली ती आजानुबाहू सात्यकिशी… आणि

५) युद्धानंतर द्वारकेत आल्यानंतर पुन्हा महर्षी आंगिरसांशी भेट व संभाषण चर्चा झाल्यानंतर द्वारकेतील त्याच्या उतार वयातील चिंतनशील मनानं वानप्रस्थ स्वीकारलेल्या…

श्रीकृष्णाच्या महत्वाच्या द्वारकेतील अंतिम वास्तव्यात त्याचा भावविश्व झाला तो एकमेव उद्धव… हे सर्वाधिक

मनाला स्पर्शून गेलेलं…

जसा आभाळातील सूर्य कधी शिळा होत नाही तसाच महाभारताचा कथा कणा असलेला तत्त्वज्ञ वीर “श्रीकृष्ण”

आज तर नाहीच पण उद्याही शिळा होणार नाही..

जन्मतःच दुर्मिळ रंगसूत्र लाभलेला “श्रीकृष्ण ” अजूनही मला भावतो आहे आणि पुढेही भावणार आहे…

म्हणूनच त्याच्या या कर्तृत्वामुळे महानतेमुळे तो मला खूपच भावतो..

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे @

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा